नवी दिल्ली: खोखो विश्वचषक २०२५मध्ये भारतीय पुरुष संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने श्रीलंकेला १००-४० असे हरवत सेमीफायनलमध्ये दमदार धडक मारली. आता १८ जानेवारीला भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
या सामन्यात पहिल्यापासूनच भारतीय संघ आघाडीवर होता. सुरूवातीपासूनच भारताने आपली आघाडी कायम ठेवताना ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. दोन टर्नरनंतर भारत आणि श्रीलंका ५८-० अशी गुणसंख्या होती. त्यानंतर भारताने ही गुणसंख्या १०० पर्यंत वाढवली.
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शनिवारी होणार टीम इंडियाची घोषणा, जाणून घ्या डिटेल्स
मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy 2025) हळू हळू जवळ येत आहे. स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. मात्र अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून टीम ...
आता भारताचा सेमीफायनलमध्ये सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी भारताचे आव्हान सोपे असणार नाही. भारताने आतापर्यंत या स्पर्धेत एकही पराभव स्वीकारलेला नाही.
दुसरीकडे भारताच्या महिला खोखो संघानेही सेमीफायनलमध्ये बाजी मारली आहे. त्यांनी क्वार्टरफायनलमध्ये बांगलादेशला १०९-१६ असे हरवले. सुरूवातीपासूनच भारताचा या सामन्यात दबदबा होता. हा दबदबा कायम राखण्यात भारताच्या महिला संघाला यश आले.