Monday, May 19, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Jioचा स्वस्त प्लान, १७५ रूपयांत वापरता येणार १० ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Jioचा स्वस्त प्लान, १७५ रूपयांत वापरता येणार १० ओटीटी प्लॅटफॉर्म्स

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी तुम्हाला आणखी काही खास पर्याय देत असते. अशातच एका पर्यायाबद्दल आम्ही बोलत आहोत.


जिओ ओटीटी प्लॅटफॉर्म अॅक्सेस देणारे दोन रिचार्ज प्लान्स ऑफर करते. जर स्वस्त प्लानबद्दल बोलायचे झाल्यास तर तो १७५ रूपयांचा येतो. या प्लानमध्ये तुम्हाला अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. कंपनीचा हा स्वस्त प्लान ओटीटीसोबत डेटाही देतो.


कंपनी २८दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर करते. यात तुम्हाला १० जीबी डेटा मिळतो. हा डेटा तुम्ही संपूर्ण व्हॅलिडिटीदरम्यान वापरू शकता. या रिचार्ज प्लानसोबत तुम्हाला १- ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळतो. कंपनी सोनीलिव्ह, जिओ सिनेमा प्रिमियम आणि दुसरे ओटीटीचा अॅक्सेस ऑफर करत आहे.



यात Lionsgate play, discovery+, sun nxt, chaupal hoichoi आणि jio tv सह दुसरे प्लॅटफॉर्म्सचा कंटेट अॅक्सेस करू शकता. कंपनी जिओ सिनेमा प्रीमियमचे सबस्क्रिप्शन कूपनच्या रूपात देईल. हे my jio अकाऊंटमध्ये येईल. तुम्हाला या कूपनचा वापर करावा लागेल.


तर दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सच्या कंटेटला जिओ टीव्ही मोबाईल अॅप्सला अॅक्सेस करू शकता. डेटा लिमिट संपल्यानंतर ६४केबीपीएसचा स्पीड मिळेल. हा प्लान त्या लोकांसाठी चांगला पर्याय आहे जे स्वस्तात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस वापरतात.

Comments
Add Comment