
'बँक ऑफ महाराष्ट्र'ला १४०६ कोटींचा तिमाही नफा
'बँक ऑफ महाराष्ट्र'ला ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत १४०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. बँकेने या तिमाहीत ७११२ कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले. 'बँक ऑफ महाराष्ट्र'ने ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ६३२५ कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले. बँकेच्या एकूण बुडीत कर्जांमध्ये (ग्रॉस एनपीए) घट होऊन ते १.८० टक्क्यांवर घसरले आहे. तसेच निव्वळ बुडीत कर्जांचे (नेट एनपीए) प्रमाण ०.२ टक्क्यांवर घसरले आहे.