Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Saif Ali Khan Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी ३२ तासानंतर एक संशयित पोलिसांच्या ताब्यात; शाहरुख खानच्या घरातही घुसखोरीचा केला होता प्रयत्न

Saif Ali Khan Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी ३२ तासानंतर एक संशयित पोलिसांच्या ताब्यात; शाहरुख खानच्या घरातही घुसखोरीचा केला होता प्रयत्न

मुंबई : सैफ अली खानवर बुधवारी रात्री बाराव्या मजल्यावर घुसून एका अज्ञात इसमाने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असून सैफची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मात्र सैफच्या घरी घुसून हल्ला करणारा हल्लेखोर दोन दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरात घुसखोरी करणाऱ्यांपैकी आहे असा पोलिसांचा संशय आहे. भिंतीवर जाळी असल्याने चोर शाहरुखच्या घरात घुसू शकला नाही. दरम्यान सैफ अलीखानच्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून त्याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Comments
Add Comment