Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीChhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी

Chhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी

रायपूर : छत्तीसगड मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) २ जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गरपा गावाजवळ आज सकाळी बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली.

गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात दोन बीएसएफ जवान जखमी झाल्याचे नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी सांगितले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी गुरुवारी शेजारील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीचा स्फोट झाल्याने सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे दोन कमांडो जखमी झाले होते.

Major Dhyan Chand Khel Ratna Award : क्रीडा विश्वातून आनंदाची बातमी! पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वोच्च काम करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार प्रदान

तर १२ जानेवारी रोजी सुकमा जिल्ह्यातील एका घटनेत १० वर्षांची एक मुलगी जखमी झाली होते. तसेच विजापूर जिल्ह्यात अशाच प्रकारच्या आयईडी स्फोटात २ पोलिस जखमी झाले होते. दोन दिवसांपूर्वी नारायणपूर जिल्ह्यातील ओरछा भागात झालेल्या अशाच २ वेगवेगळ्या घटनांत एका गावकऱ्याचा मृत्यू झाला होता. तर तिघे जखमी झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -