Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीकाळाकिल्ला आगारातील बेस्ट बस चालकांचे काम बंद आंदोलन

काळाकिल्ला आगारातील बेस्ट बस चालकांचे काम बंद आंदोलन

पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल

मुंबई : काही दिवसापूर्वीच काम बंद आंदोलन करून लोकांना वेठीस धरणाऱ्या बेस्ट उपक्रमातील आणखी एका कंत्राटदाराच्या बस चालकांनी गुरुवारी प्रवाशांना वेठीस धरण्याचे काम केले. गुरुवारी धारावीशेजारील काळाकिल्ला आगारामध्ये पगार न मिळाल्याने दुपारपासून ओलेक्ट्रा बस कंपनीचे १०० हून अधिक चालकांनी बस आगाराबाहेर न काढता काम बंद आंदोलन सुरु केले. त्यामुळे दुपारनंतर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

या आगारातील बसेस सायन हुन वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. तब्बल ६० बसेस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. पगार त्यांच्या खात्यात जमा होईपर्यंत त्यांचा संप सुरूच राहील असे बस चालकांचे म्हणणे होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरु होते.

बेस्टच्या धारावीतील काळा किल्ला आगारातील बस चालकांनी आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून अचानक बस गाड्या बंद केल्या त्यामुळे या आगारातील वातानुकूलित मोठ्या व मिडी बस आगारातच उभ्या राहिल्या त्याचा परिणाम भाईंदर ठाणे कुलाबा माझगांव येथे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला . काळा किल्ला बस आगारामार्फत भाईंदर ठाणे बॅलार्ड पियर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ओलेक्ट्रा कंपनीच्या बस गाड्या सोडण्यात येतात. या बस बंद राहिल्याने मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला .

बेस्टने या मार्गावर स्वतःच्या बस गाड्या चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न खूपच तोकडा होता . त्यामुळे इतर बस गाड्यांवरील प्रवाशांचे हाल झाले . अशा वारंवार होणाऱ्या संपामुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. बेस्ट प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा पगार मिळाला नव्हता त्याकडे बेस्ट प्रशासनाने दुर्लक्ष केले व अचानक संपाला मात्र प्रवाशांना तोंड द्यावे लागते हे नेहमीच घडत असून आता तरी बेस्ट उपक्रमाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी माझी बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली.

दोन दिवसांपूर्वी प्रतीक्षा नगर आणि धारावी डेपोच्या ११० बसेस सकाळपासून दुपारपर्यंत रस्त्यावर आल्या नव्हत्या. आता धारावी कलाकिल्ला डेपोच्या बसेसही रस्त्यावर आल्या नाहीत. गेल्या पाच वर्षांत बेस्टची स्थिती खालावत चालली आहे. दररोज ३५ लाख प्रवासी बेस्ट बसेसमधून प्रवास करतात. संपामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि बेस्टलाही महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, ऑलेक्ट्रा कंपनीला चालकांच्या खात्यात लवकरात लवकर पगार जमा करून बसेसचे कामकाज सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. प्रवाशांचा त्रास पाहून बेस्टने घाईघाईने ३० अतिरिक्त चालकांची नियुक्ती करून बसेस सुरू केल्या .

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -