Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर वडपाले ते लोणेरे रस्त्याची दूरवस्था

  232

पेव्हर ब्लॉक उखडले; दुचाकीस्वारांना करावी लागते कसरत


माणगाव : ऐन गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या (Mumbai Goa Highway) गणेशभक्तांसाठी वडपाले ते लोणेरे या पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकून घाईघाईने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. या रस्त्याची तीन ते चार महिन्यातच पूर्णपणे दूरवस्था झाली असून वाहन चालकांना खास करून दुचाकीस्वारांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरुन प्रवास करताना नाहक त्रास तर होतच आहे, पण त्यात वाहतूक कोंडीचाही मनस्ताप वाहन चालकांना व प्रवाशांना सहन करावा लागत आहे.


गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. लोणेरे ते वडपाले या रस्त्याचे काम आजही रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरु असल्यामुळे लोणेरे ते वडपाले येथे पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गणेशोत्सवापूर्वी या पट्टयाचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी अनेक आश्वासने दिली गेली. मात्र, ती फोल ठरली. अनेक आंदोलने, उपोषणे झाली, पण महामार्ग काही झाला नाही.



गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी गणपती सणापूर्वी या महामार्गाची पाहणी करण्यात येते. मात्र, तरीही याची अवस्था 'जैसे थे'च आहे. यावर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी गणेशभक्तांना वाहतूक कोंडी आणि रस्त्याचा त्रास होऊ नये म्हणून पर्यायी मार्गावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. आणि महामार्ग डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. त्याचवेळी कामचुकार करणार्‍या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले होते.


खराब झालेल्या या पर्यायी मार्गावर एखादे वाहन बंद पडले, तर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यातच शनिवार आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी तर वडपाले ते लोणेर हे तीन ते चार किलोमीटरचे अंतर कापताना तास दोन तास प्रवाशांना ताटकळत राहावे लागत आहे.

Comments
Add Comment

टायगर मेमनच्या नातेवाईकांचा फ्लॅटवरील हक्क कोर्टाने फेटाळला

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी टायगर मेमनच्या नातेवाईकांनी दाखल केलेली याचिका

मुंबईत ईद-ए-मिलादच्या सुट्टीत बदल

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुस्लिमांना ईद-ए-मिलाद सणाची सुटी शुक्रवार पाच सप्टेंबर २०२५ ऐवजी सोमवार आठ

नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकुळ

त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यात पंधरा दिवसात विविध ठिकाणी तीन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आले. जिल्ह्यात

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

IIM मुंबई NIRF मॅनेजमेंट रँकिंगमध्ये सहावा क्रमांक राखण्यात यशस्वी

मुंबई:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (IMM) ने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ च्या

दादर स्टेशनच्या पार्किंगमध्ये आग, अनेक दुचाकी झाल्या खाक

मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती आणि प्रचंड गर्दी असलेले रेल्वे स्टेशन म्हणजे दादर. या दादर स्टेशनच्या आवारातील