Saturday, February 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Rani Baug : राणीबागेच्या पार्किंग शुल्कात चारपट वाढ!

Mumbai Rani Baug : राणीबागेच्या पार्किंग शुल्कात चारपट वाढ!

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo) पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. चारचाकी वाहनांना २० रुपयांऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार असल्याने राणी बाग महागली आहे.

leopard Sterilization : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार ‘हा’ निर्णय!

देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेत दररोज ८ ते १० हजार पर्यटक येतात. पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेशद्वारातून परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये मोजतात. हे निदर्शनास आल्यामुळेच ही दरवाढ करण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र परिसरातील दुकानदारांच्या घुसखोरीचा फटका आता पर्यटकांना बसणार आहे.

राणी बागेत चौकोनी कुटुंबाला १०० रुपये तिकीट असून लहान मुलास २५ रुपये, तर प्रौढ व्यक्तीस ५० रुपये तिकीट आहे. त्यात आता पार्किंगच्या ८० रुपयांची भर पडली. उद्यान व प्राणिसंग्रहालयाला लागून असलेल्या हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी असणारे ५ रुपयांचे तिकीट दहा रुपये तर प्रौढांसाठी असणारे दहा रुपयांचे तिकीट २० रुपये करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -