मुंबई : भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) हे स्ट्राँग हिंदूत्ववादी नेते आहेत, ते तरुण असल्याने गरम रक्ताचे आहेत. मी त्यांना नेहमी समजून सांगत असतो. ते मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करत असल्याने त्यांना संयम बाळगण्यास सांगत असतो. त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्यांच्या हिंदूत्ववादी भूमिकेवर कोणी संशय घेऊ शकत नाही, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले आहे.
Aaple Sarkar : नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात
एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांना नितेश राणे यांच्या ईव्हीएमबाबतच्या ‘एव्हरी वोट अगेन्स मुल्ला’ या वक्तव्याबाबत विचारणा केली असता फडणवीस यांनी नितेश राणेंबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नितेश राणे हे हिंदूत्ववादी नेते असल्याचे सांगत एकप्रकारे नितेश राणे यांच्या कार्याची फडणवीस यांनी प्रशंसाच केली आहे.