मुंबई: बॉलिवूडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, अभिनेत्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सैफच्या मुंबई स्थित घरात घुसून या अज्ञात व्यक्तीने रात्री २च्या सुमारास धारदार शस्त्राने हा हल्ला केला. सैफ अली खानच्या शरीरावर ६ वेळा वार करण्यात आले. दरम्यान, हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.
काय म्हणाले मुंबई पोलीस?
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सांगितले की बुधवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने अभिनेत्याच्या घरात घुसला. यावेळी तो नोकरानीसोबत वाद घालू लागलाय त्यानंतर सैफने तेथे मध्यस्थी करत त्या व्यक्तीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र रागात असलेल्या त्या व्यक्तीने सैफ अली खानवरच हल्ला केला. दोघांमध्ये हाणमारी झाली. यावेळेस त्या व्यक्तीने सैफवर चाकूने ६ वेळा हल्ला केला.
#WATCH | Actor Saif Ali Khan injured during a scuffle with an intruder at home, police investigating the incident
Visuals from outside ‘Satguru Sharan’ building which houses the actor’s apartment in Mumbai’s Bandra pic.twitter.com/O1HcjvUoOU
— ANI (@ANI) January 16, 2025
ही हल्ल्याची घटना घडली त्यावेळेस कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र करिश्मा कपूरने ९ तासांपूर्वी एक पोस्ट शेअऱ केली होती. त्यात ती बहीण करिना कपूर, रिया आणि सोनम कपूरसह पार्टी करत होती. तिघांनी एकत्र डिनर एन्जॉय केला होता. करिनाने बहीण करिश्माची पोस्ट आपल्या अकाऊंटवरून रिशेअरही केली होती. दरम्यान, सैफवर हल्ला झाला त्यावेळस करिना गर्ल गँग सोबत होती की घरी होती याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.