मुंबई: २९ मार्च २०२५मध्ये न्यायाचे देवता शनी देव राशी परिवर्तन करणार आहेत. या दिवशी शनी देव कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करतील. जाणून घेऊया शनीचे हे राशी परिवर्तन कोणत्या राशींसाठी शुभदायक ठरणार आहे.
वृषभ
तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. नोकरी-व्यापाराशी संबंधित कामांमध्ये लाभ होईल. करिअरमध्ये अचानक यश मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. वैवाहिक जीवनात आनंदीआनंद राहील. गुप्त शत्रूंवर विजय मिळवू शकाल.
तूळ
नोकरीपेशा लोकांना पदोन्नतीच्या संधी निर्माण होऊ शकतात. अनेक शुभ वार्ता मिळू शकतात. धनवृद्धी होईल. खर्चामध्ये कमी होईल. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पैसे गुंतवण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. दीर्घकाळासाठी पैसे गुंतवल्यास फायदा होईल.
मकर
अचानक धन प्राप्तीचे योग बनत आहे. थांबलेले धन प्राप्त होऊ शकते. नोकरी-व्यापारात लाभाचे योग बनत आहेत. धन कमावण्याचे नवे मार्ग मिळतील. दाम्पत्य जीवनात शांती राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. मुलांकडून चांगली वार्ता मिळेल.