Sunday, May 18, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

घरात घुसखोरी, नोकराणीशी वाद नंतर चाकूने हल्ला, पाहा काय घडले नेमके...

घरात घुसखोरी, नोकराणीशी वाद नंतर चाकूने हल्ला, पाहा काय घडले नेमके...

मुंबई: पटौदी कुटुंबातील नवाब सैफ अली खानबाबत गुरूवारी धक्कादायक बातमी समोर आली. नेहमीशांत आणि वादापासून दूर राहणाऱ्या सैफसोबत हैराणजनक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने रात्री २ वाजता अभिनेत्याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे.


सैफवरील हल्ल्याबाब मुंबई पोलिसांचे विधान समोर आले आहे. सोबतच पीआरचे अधिकृत स्टेटमेंटही समोर आले आहे. जाणून घ्या अभिनेत्यावर हल्ला कधी आणि कसा झाला ते...


मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने तेथील नोकराणीशी वाद घालण्यास सुरूवात केली. दोघांच्या वादामध्ये सैफ आला. त्याने त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अभिनेत्यावरच भडकला आणि त्याने रागात सैफवर चाकूने २-३ वार केला. दोघांमध्ये बाचाबाची झाली.



काय सांगितले अभिनेत्याच्या पीआर टीमने?


सैफच्या पीआर टीमकडून जारी करण्यात आलेल्या विधानानुसार सैफच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला होता. आता रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. मिडिया आणि चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले आहे. ही पोलीस केस असून लवकरच याबाबतचे अपडेट दिले जातील.



सैफला गंभीर जखमा


सूत्रांच्या माहितीनुसार सैफला ६ जागांवर जखमा झाल्या आहेत. यात एक जखम गळ्यावरही झाली आहे. तसेच एक जखम गंभीर आहे. रुग्णालयात सैफचे ऑपरेशन सुरू आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये प्लास्टिक सर्जन, न्यूरो सर्जन उपस्थित आहेत. सैफची नोकराणीही जखमी झाली आहे. मात्र सैफच्या तुलनेत तिला कमी जखमा झाल्या आहेत.

Comments
Add Comment