Oscars ceremonyला आगीचा फटका! अमेरिकेतील ऑस्कर २०२५ सोहळा रद्द होणार?

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियातील भयावह आगीत अनेक घरे, इमारती, झाडे जळून खाक झाली असून ही आग अद्यापही धुमसतच आहे. या आगीचे परिणाम स्थानिक लोकांपर्यंतच ते जगभरातील फिल्म इंडस्ट्रीला देखील होतो आहे. अशातच आता अकादमी पुरस्कार २०२५च्या आयोजनावरही या आगीचे परिणाम दिसून येत आहेत. या आगीमुळे ऑस्कर २०२५ सोहळा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.


ऑस्कर हा मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित असा अवॉर्ड आहे. पण, यंदाच्या ऑस्करवर अमेरिकेत लागलेल्या आगीचं संकट आहे. ही आग आटोक्यात आणण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळेच २०२५ मध्ये होणारा ऑस्कर सोहळादेखील रद्द होऊ शकतो. ९६ वर्षांत अकादमी अवॉर्डस रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. या आगीमुळे ऑस्करचा नामांकन सोहळादेखील पुढे ढकलण्यात आला आहे. ऑस्कर २०२५च्या नामांकनांची घोषणा आधीच दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. ९७व्या अकादमी अवॉर्ड सोहळ्यातील नामांकांची घोषणा १७ जानेवारी २०२५ रोजी होण्याची अपेक्षा होती परंतु ते १९ आणि नंतर २३ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आले. तर २ मार्चला ऑस्कर २०२५ सोहळा आयोजित केला गेला आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेत लागलेल्या या आगीमुळे मात्र ऑस्कर बोर्ड कमिटी चिंतेत आहे. "ऑस्कर सोहळा झाला तर लोक आगीच्या नुकसानीत असताना आपण सेलिब्रेट करतोय, असे वाटेल या चिंतेत सध्या ऑस्कर कमिटी बोर्ड आहे. जरी काही दिवसांत आग आटोक्यात आली तरी संपूर्ण शहरावर याच्या जखमा आहेत आणि यातून बाहेर पडायला लोकांना वेळ लागेल. त्यामुळेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सपोर्ट करून आर्थिक निधी प्राप्त करून देत सहाय्य करण्यावर कमिटीचा भर असेल", अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Comments
Add Comment

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये उद्रेक

स्थलांतरितांच्या विरोधात लंडनमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर लंडन : नेपाळ आणि फ्रान्सनंतर ब्रिटनच्या इतिहासातील

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता