Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीत्र्यंबकेश्वराच्या चरणी भक्तांकडून सव्वा किलो सोन्याचे दान

त्र्यंबकेश्वराच्या चरणी भक्तांकडून सव्वा किलो सोन्याचे दान

नाशिक : त्र्यंबकेश्वराच्या चरणी सव्वा किलो सोने आज दान करण्यात आले. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सुवर्णदान त्रंबकेश्वरला मिळाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांनी गत महिन्यात त्रंबकेश्वर येथे देवदर्शनार्थ भेट दिली होती. त्रंबकेश्वर मंदिराचे पुजारी मनोज तुंगार यांचा मनोज मोदी यांच्याशी परिचय झालेला होता. मागील भेटीत मोदी यांनी त्र्यंबकेश्वरसाठी सुवर्ण दान करण्याचा संकल्प केला होता हा संकल्प आज त्यांनी आपले सहकारी हितेशभाई यांच्या मार्फत सव्वा किलो सोने दान देत पूर्ण केला. दरम्यान सुवर्णदानाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.

जवळपास 200 वर्षांपूर्वी असलेला त्र्यंबकेश्वरचा सुवर्ण मुखवटा नवीन बनवण्याचा संकल्प श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आला होता. यापूर्वी मनोज मोदी त्रंबकेश्वर मंदिरात आले असताना त्यांना या संदर्भाने माहिती देण्यात आली होती. कार्य बाहुल्यामुळे मनोज मोदी यांनी येथे उपस्थित न राहता येथे त्यांचे प्रतिनिधी हितेश भाई यांना पाठवून हे दान दिले. सुवर्ण पट्टी आणि नाणे स्वरूपात हे दान आहे. जवळपास एक कोटी रुपये या सोन्याची किंमत आहे. मंदिरात हितेश भाई यांनी सपत्नीक अभिषेक केला.

याप्रसंगी मनोज तुंगार आर्यन तुंगार यांनी हितेश भाई यांना आशीर्वाद दिला. मंदिरातील पुरोहितांनी देखील त्यांना आशीर्वाद दिला.

हितेश भाई यांना सुवर्णदनाची पावती देत श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून त्यांचा सत्कार विश्वस्त मंडळाकडून करण्यात आला. यावेळी विश्वस्त पुरुषोत्तम कडलग कैलास घुले रूपाली भुतडा मनोज थेटे, श्री सत्यप्रिय शुक्ल , स्वप्निल शेलार प्रदीप तुंगार मंदिर पुजारी मनोज तुंगार तसेच देवस्थानचे अधिकारी समीर वैद्य रश्मी जाधव हे उपस्थित होते.

देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानतून सड़ेआठ किलो चा सुवर्ण मुकुट बनावन्याचा संकल्प विद्यमान ट्रस्ट मंडळाने वर्षभरापूर्वी केला होता.

सदर सुवर्णदानास पाच किलो पेक्षा जास्त सोने देवस्थान कडे जमा झालेले आहे श्री मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो अशी भावना व्यक्त केली होती. परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दlन करण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांना १२५ तोळे दान करू शकतात असे त्यांना ट्रस्ट कडून सांगण्यात आले होते. त्या अनुषंगाने आज त्यांचे सहकारी हितेश भाई सपत्नीक येऊन त्यांनी रीतसर संकल्प करून सदर सव्वा किलो सोने देवस्थानकडे सुपूर्द केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -