सिंधुदुर्गनगरी : विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे शुक्रवार दिनांक १७ जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
शुक्रवार १७ जानेवारी रोजी सकाळी १०.०५ वाजता मोपा विमानतळ, गोवा येथे आगमन व राखीव. दुपारी १२ वाजता मोटारीने मातोंड, ता. सावंतवाडीकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता मातोंडा ता. सावंतवाडी येथे आगमन व देवस्थान सदिच्छा भेट.
दुपारी ३ वाजता मातोंड, ता. सावंतवाडी येथून मोटारीने माडखोल सावंत फार्म ॲण्ड अग्रो टुरिझम, सावंतवाडीकडे प्रयाण व या ठिकाणी आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग प्रेस क्लब वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी ४ वाजता सावंतवाडी येथून मोटारीने पेंडूर ता. मालवणकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता पेडूर ता. मालवण येथे आगमन व राखीव. श्री. वेताळ देवस्थान ट्रस्ट, पेंडूर आयोजित देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव कार्यक्रमास उपस्थिती.
सायं. ६.३० वाजता पेंडूर ता. मालवण जि.सिंधुदुर्ग येथून मोटारीने मोपा विमानतळ गोवाकडे प्रयाण, असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.