स्पेन : मॉरिटानिया येथून स्पेनला येत असलेली बोट समुद्रात बुडाली. या दुर्घटनेत ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४४ पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे. बोटीवर ८६ प्रवासी होते. यापैकी फक्त ३६ जण वाचले.
बोट आफ्रिकेतील मॉरिटानिया नावाच्या देशातून २ जानेवारी २०२५ रोजी निघाली. ही बोट स्पेन येथे येणार होती. पण मागील १३ दिवसांपासून या बोटीचा संपर्क तुटला होता. बोट बेपत्ता होती. बोट शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर बोट कुठे आहे ते लक्षात आले. दुर्घटना झाल्यामुळे बोट बुडली. या दुर्घटनेत बोटीवरील ८६ पैकी ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४४ पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे.
बोटीवरील ८६ प्रवाशांपैकी ६६ जण पाकिस्तानचे नागरिक होते. यातील ४४ जणांचा मृत्यू झाला आणि २२ जण वाचले.