
पुणे : भरधाव कार उलटून तरुणीचा मृत्यू झाल्याची (Accident) घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ झाला. अपघातात मोटारीतील सात जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार चालकास वाहन चालवताना डुलकी लागल्याने त्याचे वाहन वरील नियंत्रण सुटून सदर अपघात झाला आहे.
विजया बाजीराव पडवळ (वय -२९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे जखमी झाले आहेत. भरधाव कार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी मोटारचालक प्रसाद दिलीप ढोले (वय- २५, रा. सावरदरी, ता खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात कारचालक ढोले जखमी झाला आहे. पोलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बस ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव कार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाली होती. नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. कार उलटल्याने कारचालक प्रसाद याच्यासह कार मधील प्रवासी विजया, पवन, विजय, सचिन, गायत्री, सुप्रिया, संदीप गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान विजया पडवळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील पुढील तपास करत आहेत.