मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५पूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंची नावे पाहायला मिळाली.यासोबतच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ च्या मेलबर्न कसोटी गाजवणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचाही या संघात समावेश आहे. त्यांनतर आता नितीश गुडघ्यावर पायऱ्या चढत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ तिरुपती मंदिराचा आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यांनी नुकतेच इंग्लंड मालिकेपूर्वी तिरुपती मंदिराला भेट दिली. नितीशच्या वडिलांचे स्वप्न होते की, त्यांचा मुलगा एके दिवशी टीम इंडियासाठी खेळेल, जे अखेर पूर्ण झाले.ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर नितीश भारतात परतला आहे. त्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर, तो आता देवाचे दर्शन घेण्यासाठी तिरुपती बालाजी मंदिरात पोहोचला.नितीशने गुडघे टेकत पायऱ्या चढून भगवान व्यंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. नितीशने त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा भक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्याच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत. तिरुपती मंदिरात एकूण ३५५० पायऱ्या आहेत ज्या १२ किलोमीटरचे अंतर कापतात.
Young cricketer Nitish Reddy climbed the steps of Tirupati Devasthanam after returning home.
He performed excellently on the recent Australian tour.Such actions from young and upcoming celebrities are commendable, as they will inspire many youngsters to embrace Hindu culture. pic.twitter.com/jdlO9biWzh
— Mr Sinha (@MrSinha_) January 14, 2025
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर नितीश कुमार रेड्डी आता इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसेल. रेड्डीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध टीम इंडियासाठी टी-20 मध्ये पदार्पण केले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा नितीश कुमार रेड्डी हा चौथा आणि दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने ९ डावात ३७.२५ च्या सरासरीने २९८ धावा केल्या. ज्यात एका शानदार शतकाचाही समावेश होता. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात नितीशने १८९ चेंडूत ६०.३१ च्या स्ट्राईक रेटने ११४ धावा केल्या. ज्यामध्ये ११ चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. आता त्याचा प्रयत्न इंग्लंडविरुद्ध बॅट आणि बॉलने चमत्कार करण्याचा असेल.