
नाशिक : दिवसेंदिवस रस्ते अपघाताची संख्या वाढीस लागली आहे. अशातच आता मुंबई - नाशिक महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात कंटेनर, ट्रक आणि खासगी बस यांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत, त्यामधील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे समजते आहे. हा अपघात मध्यरात्री झाला आहे.

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे आयोजित महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशी आज, मंगळवारी तब्बल ३ कोटी ५० लाख भाविकांनी त्रिवेणी संगमात अमृत स्थान ...
मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ आज सकाळी पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर १४ जण जखमी झाले आहेत. कंटेनर, ट्रक व खासगी बस एकमेकांना धडकले असल्यानं हा अपघात झाला आहे. रात्री ३ च्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समजते. जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात सह खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १४ जखमी आहेत, यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.