Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीपुमाने नाव बदललं! PVMA च्या मागचं कारण काय?

पुमाने नाव बदललं! PVMA च्या मागचं कारण काय?

मुंबई : पुमा (PUMA) ही एक आघाडीची जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी उच्च दर्जाचे अ‍ॅथलेटिक शूज, लाइफस्टाइल फूटवेअर आणि इतर क्रीडा पोशाख तयार करते. मात्र सध्या स्पोर्ट्स ब्रँडसाठी (Sports Brand) जगभरात नावाजलेली कंपनी पुमा चर्चेत आहे. स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाच्या अनेक स्टोअर्सवरील फलकांवर कंपनीचे नाव पुमा ऐवजी पीव्हीएमए (PVMA) केलं आहे. हे पाहता सर्वांना आश्चर्य वाटले आहे. परंतु पुमाने नावात केलेल्या या बदलात नेमकं काय कारण आहे, जाणून घ्या.

मंत्री नितेश राणेंची सिंधुदुर्गात प्राणीसंग्रहालयाची मागणी

पुमाने इंडियाच्या अनेक स्टोअर्सवरील फलकांवर कंपनीचे नाव पुमा ऐवजी पीव्हीएमए केले आहे. याबाबत काहींनी ती स्पेलिंग चूक असल्याचे म्हटले तर अनेकांनी ती मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, पुमाने प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले आहे. पीव्ही सिंधूचा सन्मान करण्यासाठी आणि ही भागीदारी साजरी करण्यासाठी कंपनीने अनेक स्टोअरच्या साइनेजवर पुमाऐवजी पीव्हीएमएचा वापर केला आहे.

बॅडमिंटनसाठी विशेष श्रेणी सुरू करण्याच्या तयारीत

भारतातील बॅडमिंटनला नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्टामुळे पुमा पीव्ही सिंधूसोबतच्या भागीदारीचा भाग म्हणून प्यूमा बॅडमिंटनसाठी एक विशेष उच्च-कार्यक्षमता श्रेणी सुरू करण्याची योजना आखत आहे. यामध्ये बॅडमिंटनसाठी आवश्यक असणारे विशेष पादत्राणे, कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजचा समावेश असणार आहे. ही भागीदारी २०२५ च्या इंडिया ओपनपासून सुरू होणार आहे, असे पुमाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -