Thursday, January 15, 2026

Devmanus : 'देवमाणूस' च्या निमित्ताने महेश मांजरेकर-रेणुका पहिल्यांदाच एकत्र दिसणार

Devmanus : 'देवमाणूस' च्या निमित्ताने महेश मांजरेकर-रेणुका पहिल्यांदाच एकत्र दिसणार

मुंबई : नव्या वर्षात अनेक नवे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतंच 'देवमाणूस' या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.तेजस देऊस्कर दिग्दर्शित 'देवमाणूस' या सिनेमाच्या निमित्ताने रेणुका शहाणे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.हा सिनेमा एक मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे. या सिनेमाची रीलिज डेट आता समोर आली आहे.

'देवमाणूस' हा नव्या वर्षातील बहुप्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे. तेजस देऊस्कर यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. तर 'तू झुठी मैं मकार', 'दे दे प्यार दे', 'मलंग', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'वध' यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे लव फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे देवमाणूस सिनेमातून निर्माते लव रंजन हे मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. तर त्यांच्यासोबत सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Luv Films (@luv_films)

'देवमाणूस'बद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतात, "देवमाणूस प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांचा अनुभव देईल. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थसारखे उत्तम कलाकार यात आहेत. ज्यामुळे चित्रपटात असलेली पात्र मी पडद्यावर अक्षरशः जिवंत करू शकलो आहे. आम्ही निर्माण केलेले हे जग प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी मी उत्सुक आहे".तसेच निर्माते लव रंजन म्हणाले की,महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, कला, संगीतानं पिढ्यान पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा दिली आहे. मराठी चित्रपटांच्या या जगात पाऊल ठेवताना आम्हाला आनंद होत आहे. देवमाणूस हा पहिला मराठी चित्रपट आजे, ज्याची आम्ही निर्मिती करतोय.नक्कीच हा सिनेमा खास आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >