Monday, June 16, 2025

पतंग उडविणाऱ्या मुलाला कारची धडक बसल्याने मृत्यू

पतंग उडविणाऱ्या मुलाला कारची धडक बसल्याने मृत्यू

मालेगाव : मालेगाव येथील सोयगाव रस्त्यावरती पतंग उडविणाऱ्या मुलाला कार ने उडवुन दिल्याची घटना घडली आहे यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी चौफुली वरती रस्ता रोको आंदोलन देखील केले.


याबाबत अधिक माहिती अशी की मालेगाव सोयगाव रस्त्यावरील अग्निशमन दलाच्या कार्यालयाजवळ नऊ वर्षाचा आदित्य विजय लाल पाल हा बालक पतंग उडवत असताना मराठी सारे जवळील सोयगाव डीके रस्त्याजवळ आला असताना अचानक रस्त्यावरून धावणाऱ्या भरधाव कारने त्याला जोरदार धडक दिली. यात तो जखमी झाला.


त्याला तातडीने नागरिकांनी त्याला जवळच्या दवाखान्यात नेले असता त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी टेहरे चौफुली जवळ जमून रस्ता रोको आंदोलन केला आणि या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा