Saturday, February 15, 2025
Homeताज्या घडामोडीWalmik karad : कराड समर्थकांनी पुन्हा दिली परळी बंदची हाक

Walmik karad : कराड समर्थकांनी पुन्हा दिली परळी बंदची हाक

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडला बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. असे असले तरी दुसरीकडे वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतंय. मंगळवारी कराडच्या समर्थकांसह त्याच्या मातोश्रींनीही आंदोलन केले. कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी कराड समर्थकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. बुधवारी परळीमध्ये कराड समर्थकांची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे असे कराडच्या कुटुंबियांचे व समर्थकांचे म्हणणे आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी मंगळवारी कराडच्या समर्थकांनी शासकीय इमारतीवर चढून आंदोलन केले. तसेच कराडच्या मातोश्रींनीही परळीच्या पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी झालेल्या आंदोलनात समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. काही समर्थकांनी आत्मदहनाचा प्रयत्नदेखील केला होता. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना परळीत आंदोलन होण्याची शक्यता असल्यामुळे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले असताना परळीमध्ये आंदोलन होत आहे.

Mumbai – Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनर, ट्रक आणि खासगी बसचा विचित्र अपघात; ५ ठार, १४ जखमी

मंगळवारी रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आता बुधवारी कराड समर्थकांची बैठक होणार आहे. या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आंदोलनादरम्यान परळी शहर बंद ठेवण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आता न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -