Saturday, February 8, 2025
Homeक्रीडाSmriti Mandhana : स्मृती मंधाना ठरली सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज

Smriti Mandhana : स्मृती मंधाना ठरली सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज

राजकोट : भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिका राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवली जात आहे. या मालिकेत स्मृती मंधानाची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळताना स्मृती मंधानाने सर्वात वेगवान शतक झळकावलं आहे. तिने अवघ्या ७० चेंडूत चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ती भारतीय संघासाठी सर्वाधिक वेगवान शतक झळकावणारी फलंदाज ठरली आहे. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

Army Day Parade : लष्कर दिनाच्या संचलनासाठी पुण्याची निवड करण्याचे कारण काय ?

स्मृती मंधाना हिने अवघ्या ७० चेंडूत शतक पूर्ण केले. या कामगिरीसह भारतीय महिला संघाकडून सर्वात जलदग शतकी खेळीचा विक्रम आता स्मृती मंधानाच्या नावे झाला आहे. स्मृती मंधाना हिने आयर्लंड विरुद्धच्या आपल्या वादळी खेळीत ८० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १३५ धावा काढल्या. स्मृती मंधाना हिने ऑयर्लंड विरुद्धच्या जलद शतकी खेळीसह नियमित कर्णधार हरमनप्रीत कौरचा विक्रम मोडित काढला आहे. हरमनप्रीत कौरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ८७ चेंडूत शतक झळकवल्याचा रेकॉर्ड आहे. भारतीय महिला संघाकडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या बॅटरच्या यादीत ती आता दुसऱ्या स्थानावर असून स्मृती मंधाना अव्वलस्थानी विराजमान झालीये. स्मृती मंधानाने या शतकी खेळीसह महिला क्रिकेटमधील १० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय शतके झळकावणाऱ्या निवडक फलंदाजांमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

मंधानाच्या व्यतिरिक्त, मेग लॅनिंगने १५ शतके आणि सुझी बेट्सने १३ शतके झळकावली आहेत. टॅमी ब्यूमोंटनेही १० शतके केली आहेत. आयर्लंडविरुद्धच्या राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजीला येताच, स्मृती मंधानाने आयर्लंडच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. स्मृतीने ताबडतोड फलंदाजी करत प्रतिका रावलसोबत मिळून पावरप्लेमध्ये ९० धावा चोपल्या. या दोघींनी मिळून अवघ्या ७७ चेंडूत शतकी भागीदारी केली. स्मृती मंधानाने फक्त ७० चेंडूत शतकी खेळी केली. तिने प्रतीकासोबत २०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. ८० चेंडूंचा सामना करताना स्मृती मंधानाने १२ चौकार आणि ७ षटकार मारले आणि १३५ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -