Tuesday, February 11, 2025
Homeक्रीडाभारतीय महिलांनी उभारला धावांचा डोंगर

भारतीय महिलांनी उभारला धावांचा डोंगर

राजकोट : आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला संघाने आयर्लंडच्या महिला संघाविरूद्धच्या सामन्यात धावांचा डोंगर उभारला. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय महिला संघाने ५० षटकांत पाच बाद ४३५ धावा केल्या. भारताच्या दोन्ही सलामीच्या बॅटरनी शतक साजरे केले तर यष्टीरक्षक फलंदाज रिचाने अर्धशतक केले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला दिला नवा दृष्टीकोन’

प्रतिका रावलने १२९ चेंडूत एक षटकार आणि २० चौकार मारत १५४ धावा केल्या. कर्णधार असलेल्या स्मृती मंधानाने अवघ्या ८० चेंडूत सात षटकार आणि १२ चौकार मारत १३५ धावा काढल्या. प्रतिकाने ११९.३८ आणि स्मृतीने १६८.७५ च्या स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडला. यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोषने ४२ चेंडूत एक षटकार आणि १० चौकार मारत ५९ धावा केल्या. रिचाने १४०.४८ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. तेजल हसबनीसने २५ चेंडूत २८ धावा केल्या. हरलीन देओलने १० चेंडूत १५ धावांचे योगदान दिले. जेमिमाह रॉड्रिग्जने नाबाद ४ तर दीप्ती शर्माने नाबाद ११ धावा केल्या. भारताला २९ अवांतर (एक्स्ट्रॉ) मिळाले.

खो खो विश्वचषकात भारताचा पुरुष आणि महिला संघ अ गटात आघाडीवर

धावांचा पाठलाग करताना आयर्लंडच्या दोन प्रमुख बॅटर लवकर बाद झाल्या. कर्णधार असलेली गॅबी लुईस फक्त एक धाव करुन बाद झाली. यष्टीरक्षक फलंदाज कुल्टर रेली शून्य धावा करुन बाद झाली. आयर्लंडने १३ षटकांत दोन बाद ८१ धावा केल्या. सारा फोर्ब्स आणि ओरला प्रेंडरगास्ट या दोन बॅटर खेळत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -