मुंबई: थंडी आली की घराघरात तिळगुळाचे लाडू बनतात. थंडीच्या दिवसांत तीळ आणि गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर आतून गरम राहते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसांत गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे…
थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या मोसमात आपल्या शरीराला अतिरिक्त ऊर्जा आणि पोषणाची आवश्यकता असते. गूळ आणि तीळ दोन्ही अशा गोष्टी आहेत ज्या थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला पोषण आणि एनर्जी देतात.
तिळामध्ये फायबर आणि गूळामध्ये मॅग्नेशियम आढळते ज्यामुळे पाचन सुधारण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. तिळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. तिळामध्ये झिंक आणि गूळामध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्याल मदत होते.
तिळामध्ये हेल्दी फॅट्स आणि फायबर कंट्रोल करण्यास मदत करते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. तसेच वजनही नियंत्रणात राहते. गूळ आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. यासोबतच सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.