Monday, August 25, 2025

दिल्ली निवडणूक: भाजपने पंतप्रधान मोदी, अमित शहांसह ४० स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

दिल्ली निवडणूक: भाजपने पंतप्रधान मोदी, अमित शहांसह ४० स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने बुधवारी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि जेपी नड्डा यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, शिवराज सिंह चौहान यांचाही समावेश आहे. या यादीत खासदार बनलेले अनेक सिनेस्टार जसे मनोज तिवारी, दिनेश लाल यादव, हेमा मालिनी, रवी किशन, हंसराज हंस, स्मृती इराणी यांचाही समावेश आहे.

चौथ्या यादीची प्रतीक्षा

धुक्यात लपेटलेल्या राजधानी दिल्लीत निवडणुकीमुळे मात्र वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होईल तर ८ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. भाजपच्या चौथ्या यादीची प्रतीक्षा आहे. भाजपची ही शेवटची यादी असेल यात ११ जणांचा समावेश असेल. दरम्यान, सध्या पक्षाने आपल्या स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी जगत प्रकाश नड्डा राजनाथ सिंह अमित शाह नितीन गडकरी पियुष गोयल शिवराज सिंह चौहान मनोहर लाल खट्टर धर्मेन्द्र प्रधान सरदार हरदीप सिंह पुरी गिरिराज सिंह योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस हिमंत बिस्वा सरमा डॉ. मोहन यादव पुष्कर सिंह धामी भजन लाल शर्मा नायब सिंह सैनी वीरेंद्र सचदेवा बैजयंत जय पांडा अतुल गर्ग डॉ. अकला गुर्जर हर्ष मल्होत्रा केशव प्रसाद मौर्य प्रेम चंद बैरवा सम्राट चौधरी डॉ. हर्षवर्धन हंसराज हंस मनोज तिवारी रामवीर सिंह बिधूड़ी योगेन्द्र चंदोलिया कमलजीत सहरावत प्रवीण खंडेलवाल बांसुरी स्वराज स्मृति इराणी अनुराग ठाकुर हेमा मालिनी रवि किशन दिनेश लाल यादव (निरहुआ) सरदार राजा इकबाल सिंह  
Comments
Add Comment