Tuesday, May 13, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

Huppa Huiya 2 : हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्त पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Huppa Huiya 2 : हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्त पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्ताने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. आता हा मारुतीरायाचा भक्त पुन्हा प्रेक्षकांना भेटायला (Huppa Huiya 2) येणार आहे.



प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या ‘हुप्पा हुय्या’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर यांचा 'हुप्पा हुय्या २' रसिक प्रेक्षकांसाठी पूर्वीपेक्षा भव्यदिव्य व स्टायलिश ट्रीटमेंटने सज्ज होणार आहे. दिग्दर्शक समित कक्कड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 'हुप्पा हुय्या २' ची अधिकृत घोषणा करत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.


सध्या चित्रपटाच्या लेखनाचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच कलाकार आणि तंत्रज्ञांची नावे जाहीर केली जाणार आहेत. समित कक्कड फिल्म्स प्रस्तुत ‘हुप्पा हुय्या २’ ची निर्मिती अमर कक्कड, पुष्पा कक्कड आणि समित कक्कड हे करीत असून, संगीत-दिग्दर्शन अजित परब यांचे तर लेखन हृषिकेश कोळी यांचे आहे.

Comments
Add Comment