Maha Kumbh 2025 : अभिनेत्री अदा शर्मा महाकुंभमेळ्यात सादर करणार शिव तांडव स्त्रोत

  80

प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी) प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे. हा मेळा १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.या वर्षीचा महाकुंभ मेळाव्यात अनेक मोठे स्टार्स भेट देत त्याची शोभा वाढवणार आहेत. 'द केरळ स्टोरी' अभिनेत्री अदा शर्मा महाकुंभ मेळ्यात शिव तांडव स्तोत्रमचे थेट सादरीकरण करताना दिसणार आहे. अदा शर्मा ही भव्य आध्यात्मिक महाकुंभमेळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. ती शिव तांडव स्तोत्राचे थेट पठण करणार आहे.







अदा शर्मा ही मोठी शिवभक्त आहे. तिला शिव तांडव स्रोत्र पूर्ण पाठ आहे. याआधी तिनं सोशल मीडियावर शिव तांडव स्तोत्राचे उत्कृष्ट पठण केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता. आता तिला थेट महाकुंभमेळ्यात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अदा शर्मा व्यतिरिक्त या महाकुंभमेळ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊन या मेळ्याची शोभा वाढवणार असण्याची शक्यता आहे. या वर्षीचा महाकुंभ मेळाव्यात अमिताभ बच्चनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शंकर महादेवन, कैलाश खेर, शान हे गायकदेखील मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. त्यांचा खास परफॉर्मन्स होणार आहे.

Comments
Add Comment

फवाद खान, माहिरा आणि शाहीद आफ्रिदी...पाकिस्तानी सेलिब्रेटींच्या अकाऊंट्सवर २४ तासांत पुन्हा बंदी

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर