प्रयागराज : जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा अशी ओळख असलेला कुंभ मेळा सोमवारी (१३ जानेवारी) प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे. हा मेळा १३ जानेवारी रोजी सुरू झाला असून २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.या वर्षीचा महाकुंभ मेळाव्यात अनेक मोठे स्टार्स भेट देत त्याची शोभा वाढवणार आहेत. ‘द केरळ स्टोरी’ अभिनेत्री अदा शर्मा महाकुंभ मेळ्यात शिव तांडव स्तोत्रमचे थेट सादरीकरण करताना दिसणार आहे. अदा शर्मा ही भव्य आध्यात्मिक महाकुंभमेळ्यात लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे. ती शिव तांडव स्तोत्राचे थेट पठण करणार आहे.
View this post on Instagram
Premachi Gosht 2 : ‘प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित
अदा शर्मा ही मोठी शिवभक्त आहे. तिला शिव तांडव स्रोत्र पूर्ण पाठ आहे. याआधी तिनं सोशल मीडियावर शिव तांडव स्तोत्राचे उत्कृष्ट पठण केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. जो प्रचंड व्हायरल झाला होता. आता तिला थेट महाकुंभमेळ्यात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अदा शर्मा व्यतिरिक्त या महाकुंभमेळ्यात अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊन या मेळ्याची शोभा वाढवणार असण्याची शक्यता आहे. या वर्षीचा महाकुंभ मेळाव्यात अमिताभ बच्चनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना आमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. शंकर महादेवन, कैलाश खेर, शान हे गायकदेखील मेळ्याची शोभा वाढवणार आहेत. त्यांचा खास परफॉर्मन्स होणार आहे.