Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीHealth: थंडीच्या दिवसांत खाऊनपिऊन वजन करा कमी

Health: थंडीच्या दिवसांत खाऊनपिऊन वजन करा कमी

मुंबई: थंडीच्या दिवसांत आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. खासकरून या मोसमात वजन वाढणे ही सामान्य समस्या आहे. थंडीच्या दिवसांत वजन घटवण्याची प्रक्रिया मंदावते. सगळ्यात मोठी बाब म्हणजे या दिवसांमध्ये आपली फिजीकल अॅक्टिव्हिटीही कमी होते. तसेच पाणीही कमी प्यायले जाते. तसेच खाणेपिणेही वाढते..

सूर्याचा प्रकाश कमी झाल्याने शरीरात व्हिटामिन डीची कमतरता जाणवते. या सर्व कारणांमुळे मेटाबॉलिज्मवरही परिणाम होतो. अशातच तुम्ही थंडीच्या दिवसांत वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तसेच बेली फॅट कमी करायाचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत.

घरात एक्सरसाईज करा

जर थंडीच्या दिवसांत जिम जायची इच्छा होत नसेल अथवा फिरायला जायला जमत नसेल तर अॅक्टिव्ह राहण्यासाठी घरच्या घरी व्यायाम करा. घरातच योगा करा. योग सगळ्यात चांगला व्यायाम आहे. सूर्य नमस्कार करा. ब्रिस्क वॉक करा. दोरीउड्या, पायऱ्या चढणे, डान्स करणे अशा व्यायामांमुळे तुम्ही थंडीच्या दिवसांतही अॅक्टिव्ह राहू शकता.

थोडे थोडे खा

एकदम तीनवेळा भरपेट जेवण्यापेक्षा थोडे थोडे खा. यामुळे दीर्घकाळ तुमचे पोट भरलेले राहील आणि जंक फूड कमी खाल. तसेच जेवण स्किप करू नका.

भरपूर पाणी प्या

थंडीच्या दिवसांत आपण पाणी कमी पितो. मात्र ही चूक केल्याने शरीरावर त्याचा परिणाम होतो. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होते यामुळे मेटाबॉलिज्मचा वेग मंदावतो आणि शरीरासाठी वजन घटवणे कठीण होते. थंडीच्या दिवसांत तुम्ही कोमट पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील फॅट ककमी होऊन रक्तसंचलन व्यवस्थित होण्यास मदत होते. यासोबतच फॅट कमी करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्या. याशिवाय तुम्ही यात चिया सीड्सही मिसळू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -