Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Panipat War : शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरियाणात दाखल

Panipat War : शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हरियाणात दाखल

हरियाणा : पानिपतच्या रणसंग्रामाच्या स्मृती जागवणारा मराठा शौर्य दिवस १४ जानेवारीला हरियाणातील बसताडा येथे होतो. पानिपत लढाईत वीरमरण आलेल्या योध्यांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी गेली २१ वर्ष हा उपक्रम केला जातो. आज हरियाणाच्या पानिपत येथे शौर्य दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हरियाणामध्ये गेले आहेत.

 

२ मोती गाळले, लाख बांगडी फुटली, २७ मोहोरा हरवल्या आणि चिल्लर खुर्द किती गेले याची गिणतीच झाली नाही, असं वर्णन ज्या युद्धाचं केलं जातं ते युद्ध म्हणजे पानिपतचं युद्ध. या पानिपतच्या लढाईला २६४ वर्ष पूर्ण होत आहे.

याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हरियाणाच्या पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. याचे औचित्य साधून मुखमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपत येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहिले आहे. त्यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील हजेरी लावली.

Comments
Add Comment