Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

UGC NET परीक्षेच्या तारखेत बदल; नेमकं कारण काय?

UGC NET परीक्षेच्या तारखेत बदल; नेमकं कारण काय?

मुंबई : यूजीसी एनईटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्या म्हणजेच १५ जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (UGC NET) डिसेंबर २०२४ ची परीक्षा होणार होती. मात्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) तारखेत बदल केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, यूजीसी एनईटी परीक्षा आता १६ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. पोंगल, मकर संक्रांती आणि इतर सणांमुळे १५ जानेवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निवेदने मिळाली होती. त्यानंतर UGC-NET परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एनटीएने सांगितले.


दरम्यान, UGC NET परीक्षेसाठीचे अ‍ॅडमिट कार्ड २०२४ अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी UGC NET च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Comments
Add Comment