पुणे : राज्यातील थंडीत चढ उतार होत असून, थंडीच प्रभाव जानेवारी अखेरपर्यंत राहण्याचा अंदाज (Cold updates) वर्तविण्यात आला आहे.
गेले काही दिवस राज्यात थंडी जोर वाढला आहे. अनेक भागातील कमाल तसेच किमान तापमान घटले आहे. गेल्या २४ तासात काही भागात कमाल तापमान १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढल्याने उबदारपणा जाणवत आहे. मात्र मंगळवारनंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे. रविवारपर्यंत थंडीची अशीच स्थिती असेल.
याबाबतीत बोलताना ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे म्हणाले, सध्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात दुपारी ३ चे कमाल तापमान सरासरीच्या जवळपास एक डिग्रीने कमी तर पहाटेचे किमान एक डिग्रीने वाढलेले जाणवत आहे. त्यामुळे तेथे दिवसा आल्हाददायकपणा तर रात्री थंडीऐवजी ऊबदारपणा जाणवत आहे. थंडीचा हा प्रभाव, बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रावर आर्द्रता आणणाऱ्या वाऱ्यामुळे पुढील आठवडाभर म्हणजे रविवार दि. १८ जानेवारी पर्यंत असाच कमी जाणवणार आहे. आठवड्यानंतर मात्र, त्यापुढील तीन दिवस म्हणजे, सोमवार दि. १९ ते २१ जानेवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा काहीशी थंडी जाणवेल, असे वाटते.
थोडक्यात जानेवारी महिन्याच्या उर्वरित दिवसात थंडीचा चढ-उतार असाच जाणवेल, असे वाटते. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवत नाही.