Friday, October 17, 2025
Happy Diwali

जपानच्या क्यूसूमध्ये आला भीषण भूकंप, त्सुनामीचा अलर्ट

जपानच्या क्यूसूमध्ये आला भीषण भूकंप, त्सुनामीचा अलर्ट

टोकयो: जपानच्या क्यूशूमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार झटके बसले. या भूकंपाची तीव्रता ६.९ रिश्टर स्केल इतकी होती. अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी त्सुनामीचा अलर्ट दिला आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, भूकंपानंतर मियाझाकीमध्ये २० सेमी उंचीच्या त्सुनामीच्या लाटा दिसल्या.

युरोपीय भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाची खोली ३७ किमी इतकी होती. जपानच्या हवामान विज्ञान एजन्सीने सांगितले भूकंप मियाजाकी प्रांतात स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजून २० मिनिटांनी हा भूकंप आला.

जगात सातत्याने भूकंपाचे धक्के

याआधी गेल्या वर्षी ८ ऑगस्टला जपानमध्ये ६.९ आणि ७.१ तीव्रतेचे दोन भूकंप आले होते. यामुळे क्यूशू आणि शिकोकूच्या दक्षिण-पश्चिम द्वीप हलले होते.नुकताच तिबेटमध्ये सहा भूकंप आले होते. यात ७ जानेवारीला आलेल्या ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने हादरवून सोडले. तब्बल १२६ जणांचा यात मृत्यू झाला होता. तर अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती. ३००हून अधिक जण जखमी झालेत.

Comments
Add Comment