नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल अशी आशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अतिशय खास दिवस आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना माझे मनापासून अभिवादन आणि शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
‘महाकुंभ हा श्रद्धा, विश्वास आणि वैदिक परंपरांचा अमृत कलश’
महाकुंभ हा श्रद्धा, विश्वास आणि वैदिक परंपरांचा अमृत कलश आहे. जिथे संस्कृतींचा संगमदेखील आहे. श्रद्धा आणि समरसतेचा संगमही आहे. ‘विविधतेत एकता’चा संदेश देणारा महाकुंभ-२०२५ प्रयागराजमध्ये मानवतेच्या कल्याणासोबतच सनातनचा साक्षात्कार घडवून आणत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.