Saturday, February 8, 2025
Homeताज्या घडामोडीमहाकुंभ २०२५: पहिल्या दिवशी तब्बल १.५ कोटी लोकांनी केले महास्नान

महाकुंभ २०२५: पहिल्या दिवशी तब्बल १.५ कोटी लोकांनी केले महास्नान

लखनऊ: भक्तीचे महापर्व महाकुंभाची सुरूवात आजपासून प्रयागराजमध्ये झाली आहे. आज पौष पोर्णिमेला अमृतस्नान आहे. सकाळपासून भक्तगण गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमामध्ये डुबकी घेत आहे. आजा अपेक्षा होती की साधारण एक कोटीच्या जवळपास भक्तगण येथे स्थान कतील. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली की आज तब्बल दीड कोटी लोकांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नानाचे पुण्य लाभ मिळवले आहे.

१.५ कोटी लोकांनी घेतले स्नानाचे पुण्य

मुख्यमंत्री योगीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, मानवतेचे मंगलपर्व महाकुंभ २०२५मध्ये पौष पोर्णिमेच्या शुभ पर्वाला या संगमावर स्नान करण्याचे भाग्य मिळवणारे सर्व, कल्पवासी, भक्तगण यांचे हार्दिक अभिनंदन.प्रथम स्नानाच्या पर्वावर आज १.५० कोटी लोकांनी या ठिकाणी स्नानाचा पुण्यलाभ घेतला.

आजपेक्षा मोठे असेल मकर संक्रांतीचे स्नान

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह म्हणाले, मकर संक्रांतीचे स्नान आजच्या स्नानापेक्षा मोठे असेल. दीड वर्षांपासून राज्य सरकार या कुंभ मेळ्यासाठी तयारी करत होते. प्रयागराज शहरात आणि ४ हजार हेक्टरमध्ये पसरलेल्या क्षेत्रात ७ हजार कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.

कुंभमध्ये स्नान केल्याने मिळते पापांपासून मुक्ती

अशी मान्यता आहे की कुंभ मेळ्यामध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. समुद्रमंथनातू निघालेले अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षस यांच्यात १२ वर्षे युद्ध सुरू होते. या युद्धादरम्यान त्या कलशातील अमृत ज्या ठिकाणी पडले तेथे कुंभ मेळा आयोजित केला होते. १२ वर्षे युद्ध चालल्याने कुंभ दर १२ वर्षांनी एकदा य्तो. महाकुंभमधील स्नान हे शाही स्नान म्हणून ओळखले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -