Monday, September 15, 2025

La Nino : प्रशांत महासागरात 'ला निनो' सक्रिय!

La Nino : प्रशांत महासागरात 'ला निनो' सक्रिय!

पुणे : गेली दोन वर्षे 'ला निनो'तून (La Nino) तावून सुलाखून निघाल्यानंतर आला प्रशांत महासागरात 'ला निनो' सक्रिय झाल्याचे 'नोआ' या युरोपीय हवामान संस्थेने जाहीर केले आहे.

डिसेंबर अखेर 'ला निनो'चे संकेत मिळाले होते, तो सक्रिय झाला असला तरी तो कमकुवत असल्याचे 'नोआ'ने सांगितले आहे. त्यामुळे याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे बोलले जात आहे.

काय आहे ला निनो?

प्रशांत महासागरात निर्माण होणाऱ्या थंड पाण्याच्या प्रवाहाने 'ला निनो', तर गरम पाण्याच्या प्रवाहाना 'एल निनो' असे बोलले जाते. या दोन्ही घटनांचे जागतिक तापमानावर परिणाम होत असतो. एका अभ्यासानुसार, प्रशांत महासागरातील 'एल निनो'मुळे भारतीय 'मॉन्सून'वर विपरीत परिणाम होऊन त्याची सरासरी घटते. तर ज्या वेळेस 'ला निनो' निर्माण होतो, तेव्हा भारतीय मॉन्सून सरासरीच्या अधिक राहतो. गेली दोन वर्षे 'एल निनो'चा प्रभाव अधिक राहिला. यामुळे २०२४ हे वर्ष तापदायक ठरले. त्यामुळेच 'ला निनो' कमजोर राहणार असल्याचे हवामान तज्ञांचे म्हणणे आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान थंड होण्यासाठी वेळ लागणार आहे. परिणामी 'ला निनो'चा प्रभाव जाणवणार नाही.

भारतीय हवामानावर काय परिणाम होणार?

गेले काही महिने 'ला निनो' निर्माण होणार असल्याचे बोलले जात होते. 'ला निनो'मुळे थंडीचा प्रभाव अधिक वाढतो. मात्र, आता थंडीचा हंगाम लवकरच संपणार आहे, त्यामुळे भारतीय थंडीवर याचा फारसा परिणाम जाणवणार नाही. हवामान विभागाने यंदा थंडीच्या मोसमात कमाल तसेच किमान तापमान अधिक राहणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे 'निनो' कमजोर ठरणार असल्याने याचा मॉन्सूनवरही कितपत परिणाम होतो, हे लवकरच समजेल.

'ला निनो' (La Nino) अल्पकालीन सक्रिय झालेला 'मॉन्सून' कमजोर तसेच अल्पकालीन ठरणार असल्याचे जागतिक हवामान संस्थेने सांगितले आहे.

Comments
Add Comment