Tuesday, April 22, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेThane Upvan Lake : ठाण्यातील नामांकित हॉटेलला आग! आगीच्या धुरात श्वास कोंडल्याने...

Thane Upvan Lake : ठाण्यातील नामांकित हॉटेलला आग! आगीच्या धुरात श्वास कोंडल्याने मांजरीचा मृत्यू

ठाणे : ठाण्यातील नामांकित हॉटेलला भीषण आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. आग लागल्याने हॉटेल जळून खाक झाले आहे. सुमारे एक तासानंतर आग आटोक्यात आणण्यात आली गेली.

Mukkam Post Devach Ghar : ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’ चित्रपटातलं ‘सुंदर परीवानी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

आज सकाळी ६.१५ वाजता उपवन तलावाजवळील बॉम्बे डक हॉटेलमध्ये भीषण आग लागली.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन कर्मचारी आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एक तासानंतर म्हणजेच सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवण्यात यश आलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र आगीच्या तीव्रतेने धुरांचे लोट वाहू लागले. या धुरामध्ये गुदमरून एका मांजरीचा मृत्यू झाल्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -