
रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका झाडामध्ये एसटी अडकली आणि त्यामुळे मोठे संकट दूर झाले. असे असले तरी या दुर्घटनेत ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाणे : कोकणचा निसर्ग, तेथील संस्कृती,लज्जतदार सामिष खाद्यपदार्थ, कोकणी संगीत आणि कोकणची कला...असे सारे काही, अनुभवण्यासाठी विकेण्डच्या सुट्टीला ...
मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवाशांना घेऊन मंडणगड शेणाळे घाटातून जात होती. या घाटात अति तीव्र वळण असल्याने यापैकी एका उतारातून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. आणि गाडी दरीच्या दिशेने घरंगळत गेली. दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या झाडझूडपांमध्ये अडकली. बस वेगाने जात असल्याचा प्रवाशांना अंदाज आल्याने प्रवाशांना जाग आली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी हे दृश्य पाहून बचाव पथकाला कळवले. यानंतर बचाव पथकाने घटनास्थळी दाखल होऊन एसटीतील ४१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या ४१ प्रवाशांपैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याचे कळते आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.