Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीAppleला मोठा झटका, Iphoneची विक्री घटली

Appleला मोठा झटका, Iphoneची विक्री घटली

मुंबई: Appleला चीनमध्ये मोठा झटका बसला आहे. Ming-Chi Kuoने डिसेंबर २०२४चा मार्केट रिपोर्ट जाहीर केला आहे. यात चीनमध्ये Iphoneची विक्री खूप घटली आहे. चीनी मार्केटमध्ये ईयर ओव्हर ईयर शार्प घसरण दिसली आहे. डिसेंबर २०२३च्या तुलनेत डिसेंबर २०२४मध्ये १० ते १२ टक्क्यांनी आयफोनची विक्री घटली आहे.

Kuoच्या मते आयफोनच्या विक्रीतील घट ही नावीन्यपूर्ण फीचरची कमतरता हे कारण आहे. म्हणजेच आयफोनमध्ये नवे असे काही आणत आहे. त्यामुळेच ही विक्री घटल्याचे सांगितले जात आहे.

चीनमध्ये आयफोन १६ सीरिजला मोठी पसंती मिळाली नाही. आयफोन १५च्या तुलनेत आयफोन १६ची मागणी चीनमध्ये कमी आहे. चीनमध्ये ओव्हरऑल स्मार्टफोन सेल डिसेंबर महिन्यात स्टेबल राहिले. Ming-Chi Kuoचे म्हणणे आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये Apple आणि आयफोनची मागणी आणखी कमी होईल.

Ming-Chi Kuoच्या माहितीनुसार २०२५च्या तिमाहीत Appleची मागणी आणखी कमी होऊ शकते. चीनमध्ये आयफोनला Huaweiची मोठी टक्कर मिळत आहे. Appleया वर्षी म्हणजेच २०२५मध्ये आयफोन एसई४ लाँच करू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -