
मुंबई : मुंबईच्या अंधेरी परिसरात एक तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून कोसळल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशन खाली इमारतीचं बांधकाम सुरू असताना २० वर्षीय तरुण इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली कोसळला असून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने ...
मिळालेल्या माहितीनुसार, शदाप (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातील जेबी नगर परिसरात घडली आहे. जे.बी नगर मेट्रो स्टेशन खाली सहार प्लाझाच्या शेजारी नवीन इमारतीचं बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता तो इमारतीच्या १२ व्या मजल्यावर काम करत होता.अचानक तो इमारतीच्या १२व्या मजल्यावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत शदापचा जागीच मृत्यू झाला आहे. तो या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक सुपरवायझर म्हणून काम करत होता. इमारतीत काम करणाऱ्या इतर कामगारांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळतच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी शदाबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.