ठाणे : १८ वर्षाखालील मुलांच्या हातात गाडी देऊ नका असे सतत आवाहन पोलीस करत असतात. तरीही पालकांनी आपल्या पाल्याच्या हातात गाडी दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल होतो. असे असूनही असे अनेक प्रकार आजूबाजूला घडत आहेत. असाच एक प्रकार ठाण्यात घडला आहे. ठाण्यात १५ वर्षाच्या मुलाने २ रिक्षांना उडवल्याचा भीषण प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mumbai Accident : मुंबईत १२ व्या मजल्यावरून खाली कोसळून २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
ठाण्यातील घोडबंदर आनंद नगर येथे मध्यरात्री १५ वर्षाच्या मुलाने पिकअप चालवत रिक्षाला धडक दिली. रिक्षाला धडक देऊन १५ वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडले. मेट्रोच्या कामानिमित रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलाच्या आईवडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.