मुंबई : झी मराठीवर मकरसंक्रांतीच्या पूर्व संध्येला रंगणार आहे उत्सव मकरसंक्रांतीचा! ज्यात झी मराठीवरील सर्व कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या सोहळयात प्रेक्षकांना अनेक धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहता येणार आहेत.
View this post on Instagram
या सोहळयाचे खास आकर्षण असणार आहे शिवा आणि आशुचा खास गावरान शेतकरी डान्स, पारू आणि आदित्यचा सिंड्रेला राजकुमार परफॉर्मन्स सोबतीलाच सोहळ्यातील लक्षवेधी परफॉर्मन्स आहे, डॅडी म्हणजेच गिरीश ओक आणि बाई आज्जी म्हणजे सविता मालपेकर यांचा पुष्पा स्पेशल डान्स व अहिल्यादेवी श्रीकांतचा बाहुबली डान्स, सोबतच अनेक मजेशीर खेळही रंगणार आहेत. अनोखं हळदीकुंकूही आपल्याला या सोहळ्यात पाहता येणार आहे ज्यात लक्ष्मीकडून झी मराठी वाहिनीवरील सर्व सुवासिनींना हळदी कुंकू आणि वाण देऊन संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे.
View this post on Instagram
या खास कार्यक्रमाबद्दल बोलताना “नवरी मिळे हिटलरला” मधील लीला म्हणजेच वल्लरी विराजने सांगितले,” २०२५ ची आमची सुरुवात जल्लोष आणि उत्सवात झाली. वर्षाचा पहिला सेलिब्रेशनचा क्षण होता जेव्हा आम्ही सर्व झी मराठी कुटूंब एकत्र भेटलो, खूप मज्जा आली, गप्पा झाल्या. झी मराठी कुटुंबामध्ये आम्ही जेवढे नवं विवाहित आहोत ते सर्व हलव्याचे दागिने घालून सजलो होतो, गाणी गायलो, खेळ खेळलो, आणि छान नाचलो ही आहोत.
View this post on Instagram
सर्वात खास गोष्ट म्हणजे या कुटुंबात अनेक नवीन सदस्य सामील झाले आहेत. मी हर्षदा ताईंना भेटले ज्या “लक्ष्मी निवास” मध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहेत. लक्ष्मीने आम्हा सर्व नवं विवाहित सुहासिनींना हळदी-कुंकू लावून वाण दिले आहे. हे सगळं प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे १२ जानेवारी म्हणजेच रविवारी संध्याकाळी ७:०० वा. झी मराठी वर.