नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी पक्षाच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नाशिक मधील दोन माजी नगरसेवक उपस्थित राहिले नाही. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीनिशी उभे राहण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दोन माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
आगामी मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी माजी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावले होते. मात्र या बैठकीला नवीन नाशिक भागातील काही माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याचे बोलले जात आहे. हे नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा होत आहे. महापालिका निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहे. यात नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत बहुतांश माजी नगरसेवक उपस्थित राहिले असले तरी काहींनी याबैठकीला दांडी मारल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.