Monday, February 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रात कधी होणार महापालिकांची निवडणूक ? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात कधी होणार महापालिकांची निवडणूक ? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

शिर्डी : महाराष्ट्रात २९ महानगरपालिका, २३२ नगरपालिका, १२५ नगरपंचायती आहेत. यातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील काही वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. निवडणूक झालेली नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात महापालिकांची निवडणूक कधी होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते शिर्डीत भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरिय अधिवेशनात बोलत होते.

राज्यातील महापालिकांची निवडणूक कधी होणार याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयावर अवलंबून आहे. सरकारी वकील तिथे सरकारची बाजू मांडत आहेत. निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे. महापालिकांची निवडणूक पुढील तीन ते चार महिन्यांत जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे तयारीला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. पण विधानसभा निवडणुकीत चित्र बदलले. आता पुढील सर्व निवडणुकांमध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी तयारी करणे आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रामदास आठवलेंचे उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपाचे कार्यकर्ते निराश झाले होते. अपेक्षित यश मिळालेल नाही म्हणून कार्यकर्ते खचले होते. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे दौरे करुन कार्यकर्त्यांना भेटून धीर दिला. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना उभारी दिली. हजारो कार्यकर्त्यांना भेटून मार्गदर्शन केले. यामुळेच संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. त्यासाठी अमित शाह यांचे खूप खूप आभार मानतो; असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपात श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत वाईट अवस्था झाल्याचे फडणवीस म्हणाले. भाजपाने आतापर्यंतची महाराष्ट्राच्या विधानसभेतील पक्षाची सर्वोत्तम कामगिरी २०२४ च्या निवडणुकीत केली आहे. या निकालामुळे अस्वस्थ झालेले महाविकास आघाडीवाले बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या मदतीने राज्यात मतदान करण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रकारांना वेळीच आळा घातला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.समाजात दुफळी माजवण्याचे डाव हाणून पाडा असे निर्देश फडणवीसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिले.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर संतापले अजित पवार

महाविकास आघाडी व्होट जिहाद पार्ट टू राबवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा आणि सरकार विरोधात अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यांचे हे डाव एकजुटीने आणि एकदिलाने काम करून हाणून पाडावे लागतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुती सरकार कल्याणकारी योजना, जनहिताच्या योजना, राज्याच्या आर्थिक प्रगतीच्या योजना राबवत आहे. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, पात्र व्यक्तींना या योजनांचे लाभ मिळावे यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणे आणि त्याची माहिती वेळोवेळी सार्वजनिक करणे गरजेचे असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -