सीमा पवार
५ जून २०२४ सकाळी १० वा. ५२ मि. नी अमेरिकेत स्टारलायनार स्पेस क्राफ्टचे एक रॉकेट लॉन्च होते. नासाचे दोन अनुभवी अंतराळवीर यात बसले आहेत. यात आहे एक सुनीता विल्यम्स आणि दुसरे बॅरी बुच विल्मोर. जे जात होते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या एका छोट्याशा सफरीवर. हे ज्या स्टारलायनार स्पेस क्राफ्टमध्ये बसले आहे ते एका खासगी कंपनीने तयार केले आहे. त्याचे नाव आहे बोईंग. ही तीच कंपनी आहे जी एरोप्लेन पण बनवते. विशेष म्हणजे या कंपनीने तयार केलेले अनेक एरोप्लेन क्रॅश झाल्याच्या घटना पण घडल्या आहेत. त्यामुळे बोईंग या कंपनीला ही एक शेवटची संधी आहे. बोईंगने तयार केलेले स्टारलायनर स्पेस क्राफ्टचे रॉकेट तयार करून ते यशस्वीपणे अंतराळ स्टेशन गाठणार होते. या मिशनचे नाव पण बोईंग क्रू फ्लयिंग टेस्ट असे ठेवण्यात आले होते. हे यान स्पेस स्टेशनवर १.३४ मी. स्पेस स्टेशनवर पोहोचण्यास यशस्वी होतात. सुनीता विलियम्स अतिशय खूश असल्याचा एक व्हीडिओ देखील समोर आला होता. हे दोन्ही अंतराळवीर यशस्वीपणे अंतराळात पोहोचतातही. हे स्पेस क्राफ्ट तयार करणारी बोईंग आता जगातील दुसरी खासगी कंपनी बनली होती. या आधी ‘स्पेस एक्स’ या कंपनीने असे रॉकेट यान तयार केले होते आणि आतापर्यंत केवळ तीन देशच असे करू शकले आहे. ज्यात रशिया, यूएसए आणि चायना या देशांचा समावेश आहे. पण आता या आनंदाचे देखील काही क्षणच उरले होते. कारण केवळ आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांचा तेथील मुक्काम अंतराळ यानाच्या समस्यांमुळे आठ महिन्यांनी वाढल्याची एक बातमी समोर येते.
हे दोघे फेब्रुवारी २०२५ पर्यंत पृथ्वीवर परत येतील, असे सांगितले जात होते. मात्र सुनीता आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यात अजून विलंब होणार आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने ही घोषणा केली. मार्च २०२५ आधी सुनीता आणि बूच पृथ्वीवर परतणार नाहीत, असे नासाकडून सांगण्यात आले आहे. या स्पेस क्राफ्टमध्ये अशा बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत की, ज्यामुळे या स्पॅसे क्राफ्टचा वापर करता येणं अशक्य आहे. दोन्ही अंतराळवीर मागच्या १८२ दिवसांपासून अंतराळ स्थानकावरच आहेत. काही दिवसांपूर्वी सुनीताच्या अशक्तपणाबाबत व फिटनेसबाबतही चिंता निर्माण झाली होती; पण आपण तंदुरुस्त असून, सहकाऱ्यांसमवेत वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करण्यात मग्न असल्याचे सुनीताने स्पष्ट केले होते. या आधी अशी बातमी होती की, सुनीता आणि बुच पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पृथ्वीवर येतील. आता सुनीता आणि बुचच्या परतीची तारीख बदलली आहे. आता म्हटलं जातंय की, मार्च २०२५ पर्यंत दोघे पृथ्वीवर परत येतील. सुनीता आणि बुच विल्मोरला सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने त्यांचा क्रू-९ मिशनमध्ये समावेश केला आहे.
पण हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे हे असं का घडलं आणि या मागचे नेमके कारण काय? बोईंग कंपनी याला कितपत जबाबदार आहे. जाणून घेऊ या. हे विशेष आहे की, हे दोन्ही अंतराळवीर या स्पेसवर अडकले आहेत; पण ते कोणत्याही अडचणीत नाहीत असे नासानेही सांगितलेले आहे. हे इंटरनॅशनल स्पॅसे सेंटर ३६५ फूट लांब आहे. इथे दहापेक्षा जास्त लोक राहू शकतात. इथे लिविंग आणि वर्किंग स्पेस, सहा बेडरूम पेक्षाही मोठी आहे. इथे सहा लोकांना झोपण्याची जागा आहे. इथे खाण्याची, पाण्याची सोय, कपड्यांसह ऑक्सिजनचीही सोय आहे. दोन बाथरूम, एक जिम आहे.
३६० व्यूचे विंडो देखील आहे. हे एक मोठे फाईव्ह स्टार हॉटेल नसले तरी एका स्पेसवर सर्वाइव करण्यासारखी जागा नक्कीच आहे. या स्पेसवर ऑक्सिजन जनरेटर सिस्टम आहे, जे ऑक्सिजनला रिसायकल करते. आपण श्वास सोडताना जितका कार्बन डायऑक्साईड सोडतो त्यावेळी काही प्रमाणात ऑक्सिजनही थोड्या प्रमाणात बाहेर सोडतो. ते बाहेर सोडलेले ऑक्सिजन साठवून ऑक्सिजनला रिसायकल केले जाते. पाण्यासाठी शिवांबू प्रक्रिया करून त्याच्यापासून पिण्याचे पाणी तयार केले जाते. तर सहा महिने पुरेल इतके खाण्याचे पदार्थ स्पेसवर आहेत. सध्या स्पेसवर या दोघांशिवाय सातजण आहेत. यात नासाचे चार अंतराळवीर आहेत. यात माइक बर्राट, मॅथ्यू डॉमनिक, जेनेट ईप्स, ट्रेसीसी डायसन, तर रशियन स्पेस एजन्सी रॉकॉसमॉसचे तीन अंतराळवीर ओल्लेग कोनेनेन्को, निकोलो चब आणि अलेक्झांडर ग्रेबेनकिन आहे. या टीमला एक्सपेडिशन ७१ असेही म्हटले जाते. २००० मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या स्पेस स्टेशनवर दर सहा महिन्यांनी अंतराळवीर जात असतातच.
खरं तर सुनीता आणि बुच यांच्या ५ जूनला झालेले लॉन्चिंग ६ मे रोजी होणार होते. पण काऊंटडाऊनच्या दोन तास आधी हे लाँचिंग थांबविण्यात आले. प्रेशर वॉल खराब असल्यामुळे ते थांबविण्यात आले होते. त्यानंतर १ जूनला झालेले लॉन्चिंगही ४ मिनिटे आधी कॉम्प्युटर अबोर्ट सिस्टिमकडूनच रद्द झाले होते. त्यानंतर ५ जून हा दिवस उजाडला आणि हे रॉकेट लॉन्च झाले. मात्र यावेळीही हेलियम लीक झाल्याचे दिसून आले. स्पेस क्राफ्ट ज्यावेळी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जोडले जाते त्यावेळी या हेलियमचा उपयोग होतो. पण हा काही मोठा प्रॉब्लेम नव्हता असे बोईंग कंपनीच्या इंजिनीर्सकडून सांगण्यात आले. त्यामुळे हे यान लॉन्च केले गेले. पण लाँच झाल्यानंतरही यात चार हेलियम लीक झालेले दिसतात. बोईंगचे क्रू मॅनेजर मार्क नॅप्पी याचं उत्तर होतं की, ‘हम नहीं जानते के ये कैसे हुवा, हमें ये समझना होगा’. त्यामुळे सुनीता आणि बॅरि बुच अंतराळात सुरक्षित पोहोचल्यानंतर आता नासाने त्यांना आठ दिवसांत परत न आणण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता. आठ दिवसांत परत येणारे हे दोघे आता नासाने स्पेस एक्स क्रू ड्रॅगन स्पेस क्राफ्टचा वापर करणार. फेब्रुवारी २०२५ मध्ये ज्यावेळी स्पेस एक्सचा क्रू ९ मिशनवर ४ ऐवजी २ लोकांनाच पाठवण्यात येणार.
सुनीता विल्यम्सने तिच्या कारकिर्दीत ३२२ दिवसांपेक्षा जास्त दिवस अंतराळात काढले आहेत, ज्यामुळे ती इतिहासातील सर्वात अनुभवी महिला अंतराळवीरांपैकी एक आहे. विल्यम्सला तिच्या स्पेसवॉकमधील यशासाठी साजरे केले जाते, ज्यांनी एकूण ५० तासांहून अधिक अंतराळयान चालवले होते. या कामगिरीमुळे तिला सर्वात जास्त स्पेसवॉक करणारी महिला अंतराळवीर ही पदवी मिळाली. त्यांच्या शौर्य आणि समर्पणाने त्यांना जगभरातील महत्त्वाकांक्षी अंतराळवीरांसाठी आदर्श बनवले आहे. सुनीता विल्यम्स यांचा सन्मान आणि मान्यता त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, विल्यम्सला नेव्ही कमेंडेशन मेडल आणि नासा स्पेसफ्लाइट मेडलसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये, तिला अंतराळ संशोधनातील योगदानाबद्दल, भारताचा तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण मिळाला.
सुनीता विल्यम्सचे यश तिच्या रेकॉर्ड्स आणि प्रशंसेच्या पलीकडे आहे. अतिशय अनुभवी अशा सुनीताच्या नावावर दोन शटल मोहिमांसह तब्ब्ल ३२२ दिवस ऑर्बिटमध्ये असल्याची नोंद आहे आणि आताच्या या स्टारलाईनरने तिच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण अशी भर घातली आहे. इतकेच नाही तर सुनीता विलियम्सच्या नावावर ५० तास ४० मिनिटे असा महिलांमधील सर्वाधिक स्पेसवॉक केल्याचा विक्रमदेखील आहे. अशा अंतराळवीर सुनीता विल्यम्स या लवकरच पृथ्वीवर परत येणार आहे.