साप्ताहिक राशिभविष्य, १२ ते १८ जानेवारी २०२५
परदेश गमनाची शक्यतामेष : या आठवड्यात अनुकूल ग्रहमानाचा वरदहस्त लाभल्यामुळे, शुभ ग्रहांची साथ मिळाल्यामुळे हा काळ आनंददायी ठरेल. व्यवसाय धंद्यातील वातावरण समाधानकारक राहून नोकरीतील परिस्थितीसुद्धा अनुकूल राहील. नोकरीतून काही मनाला आनंद देणाऱ्या वार्ता मिळू शकतात. नव्या घटनांचा लाभ मिळू शकतो. एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. तसेच प्रवासाचे योगही आहेत. परदेश गमनाची शक्यता. व्यावसायिक जुनी येणी वसूल झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. व्यवसायात काही नवीन संकल्पनांचा वापर योग्य ठरेल. नवीन तंत्रज्ञान वापरू शकाल. व्यावसायिक विस्तार करण्याच्या योजना आकार घेऊ शकतील. तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. |
|
शुभवार्ता मिळतीलवृषभ : प्रगती व उन्नतीला पोषक असे ग्रहमान असल्यामुळे आपल्या आजूबाजूस वेगवान घटना घडतील. विविध क्षेत्रांतून लाभ मिळेल; परंतु सर्व बाबतीत शांततेने निर्णय घेतल्यास अपेक्षित गोष्टी सहज साध्य करता येतील. आर्थिक आवक उत्तम राहील. मित्र-नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. शुभवार्ता मिळतील. काहींना जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ करावी लागेल; मात्र आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. तसेच वाहनांचा वेग मर्यादित ठेवा. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. तसेच वाहतुकीचे नियम पाळणे हितकारक ठरेल. स्वतः कायद्याची बंधने पाळा. |
|
प्रसिद्धीसह अर्थार्जन वाढेलमिथुन :रोजच्या जीवनात अचानक बदल घडू शकतो. महत्त्वाच्या घटना घटित झाल्यामुळे आपल्या रोजच्या दिनक्रमात सुद्धा फरक पडेल. काही सुखद प्रसंग घडतील. मात्र विचित्र स्वभावाची माणसे भेटू शकतात. जवळच्या व्यक्ती सुद्धा काही वेळेस वेगळ्या वागल्यामुळे आश्चर्य वाटेल. त्यामुळे आपण विचारात पडू शकता. प्रसिद्धीसह अर्थार्जन वाढेल. प्रेमप्रकरणात जरा जपूनच पुढील पावले उचलावीत. गैरसमज होण्याची दाट शक्यता. तसेच वैवाहिक जीवनात वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. एखाद्या गोष्टीविषयी पूर्ण माहिती घेऊनच आपले मत व्यक्त करा. ऐकीव माहितीवर फारसा विश्वास ठेवू नका. मानसन्मानाचे योग. व्यवहार होतील. |
|
भाग्य बीजे पेरली जातीलकर्क : प्राप्त ग्रहमान आपल्याला अपवादात्मक परिस्थितीतून लाभ देऊ शकते. या कालावधीमध्ये आपली भाग्य बीजे पेरली जातील. नोकरीमध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर असेल. ती पूर्ण करण्याची जबाबदारी पडेल. तसेच व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून पुढील पावले टाकण्यास हरकत नाही. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. काही वेळेस महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यातून मार्ग काढावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रात वादविवादांना स्थान देऊ नका. शेती व कायदेविषयक कार्यांना गती मिळेल. |
|
आपल्या मताला प्राधान्य मिळेलसिंह : कुटुंबामध्ये काही चांगल्या वार्ता येतील. त्यामुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. अचानक झालेले पाहुण्यांचे आगमन आश्चर्यचकित करू शकते. नातेवाईक आप्तेष्ट इत्यादींना आपल्या मदतीची गरज लागू शकते व ती आपण उपलब्ध करून द्याल. कुटुंबातील मुला-मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीपर बातम्या कानावर येतील. काहींना परदेशगमन तसेच काहींचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी मिळेल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. आपल्या मताला प्राधान्य मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. |
|
मोठ्या उलाढाली होतीलकन्या : सदरचा कालावधी हा इच्छापूर्तीचा ठरेल. बरेच दिवस आपल्या मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. परमेश्वरावर विश्वास बसेल. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडत चाललेल्या अनुभवून आश्चर्य वाटेल. मात्र कुटुंबात भावा-बहिणीबरोबर वादविवादाची शक्यता, वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल. व्यवसाय-धंद्यात मोठ्या उलाढाली होतील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बदल घडतील. नवीन करार होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. |
|
मनोरंजनासाठी खर्च वाढेलतूळ : शुभग्रहांचे पाठबळ मिळाल्यामुळे आजूबाजूला सकारात्मक घटना घडतील. त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल. आपल्या समोरील कामे वेगाने करावीत. सामाजिक मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यामध्ये सक्रिय योगदान द्यायला एखादे महत्त्वाचे पद मिळेल. प्रसिद्धीसह आर्थिक उत्पन्न वाढेल. सहकुटुंब, सहपरिवारसह आपण एखाद्या पर्यटन स्थळाला भेट द्याल. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. तरुण-तरुणींना आपल्या आवडत्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. मनोरंजनासाठी खर्च वाढेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. |
|
वाद-विवाद सांभाळावृश्चिक :सदरच्या कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या घटना घडून आपला भाग्योदय होऊ शकतो. विविध गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. मात्र स्त्री वर्गास साप्ताह थोडा अडचणीचा ठरू शकतो. वैवाहिक जीवनातील वाद-विवाद सांभाळा. आपल्या बोलण्यावर नियंत्रण हवे. समज-गैरसमज वाढू शकतात. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. ऐकीव माहितीवरती आपले मत निश्चित करू नका. नोकरीमध्ये दिलासा मिळेल. पदोन्नती, वेतन वृद्धी सारख्या घटना घडू शकतात. कौटुंबिक सुख लाभेल. |
|
सरकारी कामे होतीलधनू : एकूण ग्रहमान आपल्याला साथ देणारे असल्याने आतापर्यंत प्रदीर्घ काळ विविध प्रश्न आपल्याला सोडविता येतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे तसेच समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन या कामी आपल्याला उपयोगी पडेल. मित्र मंडळींची मदत सुद्धा मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीविषयीचे असलेले वाद मिळतील. सर्वमान्य तोडगा निघेल. त्यातून धनलाभ होईल. व्यवसाय धंद्यातील दीर्घकाळ रखडलेली सरकारी कामे होतील. स्वतःच्या कामाबाबत जागरूक राहावे. |
|
अनुकूलता लाभेलमकर : व्यवसाय, धंद्यात, नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. नोकरीमध्ये एखादी महत्त्वाची जबाबदारी पार पडल्यामुळे आपल्या कामाचा प्रभाव इतरांवर पडेल. नोकरीतील वरिष्ठांशी संबंध सुधारतील. हाताखालील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीत खुल्या वातावरणाचा लाभ मिळेल. व्यवसाय-धंद्यातील परिस्थिती सुधारल्यामुळे नवीन संकल्पना राबवू शकाल. तसेच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकाल. व्यवसाय विस्ताराचा विचार योग्य ठरेल. परदेशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात. जुनी व्यावसायिक नाती नव्याने प्रस्थापित होतील. नवीन अनुबंध जोडले जातील. विवाह ठरू शकतात. |
|
महत्त्वाचे काम पूर्ण होईलकुंभ :नोकरी-व्यवसायात विशिष्ट महत्त्वाचे काम पूर्ण होईल. नोकरी-व्यवसायात योग्य व्यक्तींकडून योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळेल. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखती सफल झालेल्या अनुभवता येतील. चालू नोकरीत बदल हवा असल्यास त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास सफलता मिळू शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र कामाचा ताण जाणवेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. संयम सोडू नका. स्वतःच्या रागावर नियंत्रण आवश्यक राहील. खर्चाचे प्रमाण वाढत चाललेले दिसेल. त्यामुळे अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे ठरेल. घरी पाहुण्यांचे अचानक आगमन होऊ शकते. वाद-विवाद टाळणे गरजेचे |
|
लोकसंग्रहात वृद्धी होईलमीन :कार्य व्याप्ती वाढल्यामुळे काम जास्तीचे करावे लागेल. दैनंदिन कामकाजात व्यग्र राहावे. काही कामात अधिक परिश्रम घ्यावे लागण्याची शक्यता आहे. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या कामांमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. काही प्रमाणात खर्च पण करावा लागेल. संयम ठेवल्यास कार्य पूर्ण करू शकाल. ध्येयापासून विचलित होणार नाही याची दक्षता घ्या. कौटुंबिक समस्या सुटतील, मात्र स्वतःच्या बोलण्यावर आणि वर्तणुकीवर नियंत्रण ठेवा. लोक संग्रहात वृद्धि होईल. व्यवसाय, धंदा, नोकरी अथवा कौटुंबिक कारणास्तव प्रवास करावा लागेल. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होईल. मानसन्मान वाढेल. |