नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प सोमवार २० जानेवारी रोजी दुसऱ्या कार्यकाळासाठी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. वॉशिंग्टन डी. सी. येथे होणार असलेल्या या सोहळ्यासाठी भारताला आमंत्रण मिळाले आहे. शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीने (उद्घाटन समिती) भारताला आमंत्रण पाठवले आहे. भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शपथविधी सोहळ्याला उपस्थित असतील. ते सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करतील.
On the invitation of the Trump-Vance Inaugural Committee, External Affairs Minister, Dr. S. Jaishankar will represent the Government of India at the Swearing-in Ceremony of the President-Elect Donald J. Trump as the 47th President of the United States of America.
Press Release :…
— Randhir Jaiswal (@MEAIndia) January 12, 2025
अमेरिकेत २०२४ मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला होता. परंपरेनुसार अमेरिकेत नव्या अध्यक्षांचा शपथविधी २० जानेवारी रोजी होतो. यामुळे ट्रम्प सोमवार २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतील. ट्रम्प अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात दुपारी १२ पासून होणार आहे. शपथविधी, संचनल (परेड), औपचारिक कार्यक्रम हे सर्व शपथविधी सोहळ्याचा भाग आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला कोणकोणत्या देशाचे नेते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती झेवियर मिलेई ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला असे समजते.
ट्रम्प – हॅरिस निवडणूक
अध्यक्षपदासाठी अमेरिकेत २०२४ मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना ३१२ तर कमला हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल व्होट मिळाली. निवडणुकीत ७ कोटी ७३ लाख ३ हजार ५७३ नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान केले तर ७ कोटी ५० लाख १९ हजार २५७ जणांनी कमला हॅरिस यांना मतदान केले. अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या सर्व उमेदवारांपैकी ४९.९ टक्के मते एकट्या ट्रम्प यांनाच मिळाली तर कमला हॅरिस यांना ४८.४ टक्के मते मिळाली.