Sunday, April 20, 2025
Homeदेशपंतप्रधान सोमवारी जम्मू-काश्मीरला देणार भेट, सोनमर्ग बोगद्याचे करणार उद्घाटन

पंतप्रधान सोमवारी जम्मू-काश्मीरला देणार भेट, सोनमर्ग बोगद्याचे करणार उद्घाटन

नवी दिल्‍ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी ११:४५ च्या सुमारास सोनमर्ग बोगद्याला भेट देतील आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. सोनमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथील ‘झेड-मोर’ बोगद्याच्या उद्घाटनासाठी जाण्यास मी अतिशय उत्सुक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुमारे १२ किमी लांबीचा सोनमर्ग बोगदा प्रकल्प २७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. यामध्ये ६.४ किमी लांबीचा सोनमर्ग मुख्य बोगदा, एक बहिर्गमन बोगदा आणि जवळचे रस्ते यांचा समावेश आहे. समुद्रसपाटीपासून ८६५० फूट उंचीवर असलेला हा बोगदा लेहकडे जाताना श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान सर्व ऋतुंमध्ये संपर्क सुविधा सुकर बनवेल. तसेच भूस्खलन आणि हिमस्खलन या समस्यांना मागे टाकून आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या लडाख प्रदेशात सुरक्षित आणि विनाखंड प्रवास सुनिश्चित करेल. या बोगद्यामुळे सोनमर्गचे वर्षभर पोहचता येणाऱ्या पर्यटन स्थळात रूपांतर होऊन हिवाळी पर्यटन, साहसी खेळ आणि स्थानिक उपजीविकेला चालना मिळेल, परिणामी पर्यटनाला चालना मिळेल.

२०२८ सालापर्यंत पूर्ण होणाऱ्या झोजिला बोगद्यामुळे या मार्गाची लांबी ४९ किमी वरून ४३ किमी पर्यंत कमी होईल तर वाहनाचा वेग ताशी ३० किमी वरून ताशी ७० किमी पर्यंत वाढेल, आणि श्रीनगर खोरे ते लडाख दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वर संपर्क सुविधेची अखंडता सुनिश्चित होईल. ही वर्धित संपर्क सुविधा, संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये संरक्षण लॉजिस्टिक्स, आर्थिक वाढ आणि सामाजिक-सांस्कृतिक एकात्मतेला चालना देईल.

या अभियांत्रिकी साहसिक कार्यातील त्यांच्या योगदानाची नोंद घेत, अत्यंत कठीण परिस्थितीत काळजीपूर्वक काम करणाऱ्या बांधकाम कामगारांनाही पंतप्रधान भेटणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -